Uddhav Thackeray Konkan Visit | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज कोकण दौरा
तोक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (शुक्रवारी) सिंधुदुर्ग, रत्नागिरी दौऱ्यावर जाणार आहेत. तोक्ते चक्रीवादळामुळे कोकणात अनेक गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेकडो घरांची पडझड झाली असून अनेक ठिकाणी शेतीचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. तेथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत, तसेच प्रशासनाकडून नुकसानीचा आढावाही घेणार आहेत.