Uddhav Thackeray | कोरोनाचं चित्र भीतीदायक, नियम पाळा, लॉकडाऊनची वेळ येऊ देऊ नका : मुख्यमंत्री ठाकरे
कोरोनाचं भीतीदायक चित्र आहे. ग्रामीण भागात आता कोरोना वाढत चालला आहे. दुसरी लाट आली की काय अशी भीती आहे. हे संकट वाढत आहे त्यामुळं आपल्याला खबरदारी घ्यावी लागेल. पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ देऊ नका. काही लोकं मास्क चुकीच्या पद्धतीनं घालतात. काही गोष्टी आपण जबाबदारीनं पाळल्या पाहिजेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.