CM Uddhav Thackeray : पंचनामे झाल्यानंतर मदतीचा निर्णय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
तोक्ते चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोकण दौरा करत नुकसानीची पाहणी केली. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला तोक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. तौक्ते चक्रीवादळाने नेमके किती नुकसान झाले याबाबतचे पंचनामे पूर्ण होवू द्या, संपूर्ण आढावा घेऊन व्यवस्थित मदत केली जाईल, कुणीही वंचित राहणार नाही असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज म्हटलं आहे.