Coronavirus | कोरोनाचे नियम पाळणं अत्यंत आवश्यक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : काही दिवसांसाठी एमपीएससीची 14 मार्चची परीक्षा पुढे ढकलत आहोत. उद्या परीक्षेची तारीख जाहीर होईल आणि ही तारीख आठवड्याभरातलीच असेल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (11 मार्च) केली. त्याचसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाबाबतही भाष्य केलं. तसेच कोरोनाचे नियम पाळणं अत्यंत आवश्यक असल्याचं यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. 

"कोरोनाचा धोका वाढतोय. मुंबईत दररोजचा आकडा 300 ते 350 वर गेला होता. किंबहुना आपल्या राज्यात दररोजची रुग्णसंख्या ही 2 हजारांपर्यंत खाली आली होती. ती पुन्हा 11 हजार, 12 हजार, 13 हजारांच्या टप्प्यांत गेली आहे. मास्क घालणं, हात धुणं, अंतर ठेवणं ही त्रिसूत्री आहेच. ही पाळणं गरजेचं आहेच परंतु, आता मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरु केलेलं आहे. अनेकजण आजही टेस्ट करून घ्यायला नकार देत आहेत. कारण विलगिकरण कक्षात जाव लागेल का? 80 टक्के रुग्ण असे आहेत ज्यांना लक्षणं नाहीत. टेस्ट करून घ्यायला घाबरू नका." असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola