Uddhav Thackeray on re-lockdown| राज्यात लॉकडाऊन लागणार नाही;पण नियमांची कडक अंमलबजावणी: उद्धव ठाकरे

Continues below advertisement
मुंबई : राज्यात कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग पुन्हा एकदा फोफावताना दिसत असल्यामुळं नाईलाजानं काही कठोर पावलं उचलली जाती असा स्पष्ट इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर याबाबतचे निर्णय घेतले जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. ज्यानंतर कोविडविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली. या बैकीनंतर काही महत्त्वाच्या सूचना लागू करत त्या अंमलात आणण्यासाठी राज्य शासन आग्रही असल्याचं स्पष्ट झालं.
तूर्तास राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार नाही असंच सध्या कळत आहे. लॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवायचे आहे, असं म्हणत लोक मास्क घालत नाहीत किंवा आरोग्याचे नियम पाळत नसतील तर जिल्हा आणि पोलीस प्रशासनावर हे नियम काटेकोरपणे अंमलात आणण्याची जबाबदारी आहे, त्यांनी अजिबात शिथिलता न दाखवता कडक दंडात्मक व आवश्यक कारवाई केलीच पाहिजे असं राज्यातील प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram