CM Thackeray-Governor Koshyari Meet : मुख्यमंत्री ठाकरे - राज्यपाल कोश्यारी भेटीची चर्चा

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा आज 79 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राजभवनावर दाखल झाले. मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

सत्तेत आल्यापासून राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असं चित्र पाहायला मिळत होतं. त्यात मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात पत्रावरुनही संघर्ष झालेला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यपालांची भेट घेऊन हा तणाव काहीसा निवळण्याचा प्रयत्न केला, असं मत राजकीय विश्लेषक मांडत आहेत.

दरम्यान, या भेटीदरम्यान राज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या 12 नावांच्या यादीवर चर्चा झाल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरच मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली असावी असाही अंदाज राजकीय विश्लेषकांचा आहे.    

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola