Maharashtra Lockdown News | महाराष्ट्रात 14 एप्रिल किंवा त्यानंतर लॉकडाऊन?

Continues below advertisement

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता आणि रोज वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता दाट झाली आहे. सतत वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज लॉकडाऊनसंदर्भात मोठा निर्णय घेऊ शकतात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीनंतर लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आता निर्णय घेण्याची वेळ आहे. राज्यात लॉकडाऊनला पर्याय नाही. दरम्यान राज्य सरकारने गेल्या आठवड्यात कडक निर्बंध जाहीर केले होते. ज्यात वीकेंड लॉकडाऊन, रात्रीचा कर्फ्यू आणि दिवसा जमावबंदी यांसारख्या आदेशांचा समावेश होता. पुढील आदेश येईपर्यंत हे निर्बंध 30 एप्रिलपर्यंत सुरू राहतील.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram