शिवसेना-भाजप युतीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.. 30 वर्षात काही झालं नाही, पुढे काय होणार?

मुंबई : गेल्या काही दिवसाता राज्यात भाजप आणि शिवसेनेची जवळीक वाढत असल्याची चर्चा सुरु होती. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षातील नेत्यांना एकमेकांना मित्र म्हटलं होतं. यानंतर वेगळीच राजकीय चर्चा रंगू लागली होती. आता शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. शिवसेना आणि भाजपमधील जवळीक याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रकारांना विचारलं असता, कुठेही जात नसल्याचे त्यांनी सांगितले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola