CM Thackeray : मास्क लावून फिरणं आयुष्याचा अविभाज्य भाग, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं नागरिकांना आवाहन

राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ  लागली आहे. आज 6,600  नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 431 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 83 हजार 319 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.61टक्के आहे. 

राज्यात आज 231 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. तब्बल 30 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या  77 हजार 494 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (9), जालना (92), हिंगोली (70), वाशिम (84), गडचिरोली (54)या पाच जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 16, 001 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola