मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली कोरोनाची लस, लसीकरणानंतर काय म्हणाले ठाकरे?
मुख्यमंत्र्यांनी आज जे.जे. रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. “लसचे कोणतेही दुष्परिणाम नाहीयेत, मी स्वत: लस घेतली आहे आता जनतेनंही घ्यावी असं मी सर्वांना आवाहान करतोय. काही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल पुन्हा पहिल्यासारखं करायचं पाहिजे का? लोकांमध्ये आजही जनजागृती झाली पाहिजे. काही ठिकाणी अंशता लॉकडाऊन आहे आम्ही लाॅकडाऊन संदर्भात एक दोन दिवसांत निर्णय घेऊ.” असं मुख्यमंत्री म्हणाले.