Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील होते.
Tags :
Maratha Reservation Supreme Court SEBC Act Maratha Reservation LIVE Maratha Reservation In Maharashtra State Government New Delhi Special Report Maratha Aarakshan