कोरोनामुळे मुख्यमंत्र्यांवर मंत्रीकपात करण्याची वेळ येईल;सामनाच्या रोखठोक सदरात संजय राऊतांची भूमिका
Continues below advertisement
कोरोनाची परिस्थिती अशीच राहिली तर मुख्यमंत्र्यांवर मंत्रीकपात करण्याची वेळ येईल अशी भूमिका राऊतांनी सामनाच्या रोखठोक सदरात मांडलीय. महाराष्ट्रातील सर्वच मंत्री आज आपापल्या जिल्ह्यातील कोरोनाच्या लढाईत जुंपले आहेत. अनेक मंत्र्यांनी ३ महिने मुंबईचे तोंड पाहिलेले नाही. मलईदार खात्यांसाठी भांडणारेदेखील आता खाती मिळूनही रिकामेच आहेत. मंत्रालय, सरकारी कार्यालयांमधील शांतता एक प्रकारची हतबलता दाखवित आहे. हे असेच राहिले तर कामगार कपातीप्रमाणे ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर येईल असं राऊतांनी म्हटलंय.
Continues below advertisement