Mavovadi Action Mode: 'माओवाद्यांनी जंगलात बोलावलं असतं तर तिथेही गेलो असतो, फडणवीसांचं वक्तव्य
Continues below advertisement
गडचिरोलीतील (Gadchiroli) माओवादी शरणागतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. ‘आमची होती की मुख्यमंत्र्यांच्या समोर आम्ही सरेंडर करू’, या माओवाद्यांच्या मागणीवर बोलताना, ‘त्यांनी जंगलात जरी बोलावलं तरी मी यायला तयार आहे,’ असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. त्यांनी पोलिसांच्या शब्दाचा मान ठेवण्यासाठी आपण सर्व कार्यक्रम रद्द करून आल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या टीकेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोलीतील परिस्थिती बदलल्याचा दावा केला. पवार यांच्या मते, आता नक्षलवाद मोठ्या प्रमाणात आटोक्यात आला असून, करोडो रुपयांचे उद्योग आणि रोजगार निर्माण झाले आहेत. तसेच, इंग्लिश मीडियम शाळा व रुग्णालयांमुळे विकासाला गती मिळाली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement