CM Eknath Shinde Vs Vijay Wadettiwar : लाडक्या भावाचीही व्यवस्था, गॅसचे भाव कमी केल्यानं विरोधक गॅस

Continues below advertisement

CM Eknath Shinde Vs Vijay Wadettiwar : लाडक्या भावाचीही व्यवस्था, गॅसचे भाव कमी केल्यानं विरोधक गॅस

हेही वाचा : 

महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Monsoon Session) सुरु आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानपरिषदेचं कामकाज सुरु होताच सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. शेकापचे जयंत पाटील, (Jayant Patil) काँग्रेसचे भाई जगताप, (Bhai Jagtap) अभिजित वंजारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक (Vidhan Parishad Speaker Election) कधी लावणार हा मुद्दा उपस्थित केला.  यावर उपसभापती नीलमताई गोऱ्हे (Neelamtai Gorhe) यांनी सोमवारी गटनेत्यांच्या बैठकीत हे विषय मांडू असं म्हटलं.

शेकापचे नेते जयंत पाटील यांनी विधानपरिषदेच्या सभापती पदाचा मुद्दा उपस्थित केला. सभागृह संविधानाप्रमाणं चाललं पाहिजे. सभापतीची निवडणूक लावण्याबाबत ठराव मांडणार आहे, यावर आपल्याला चर्चा करावी लागेल, असं जयंत पाटील म्हणाले. गेली अनेक वर्षे सभापतीपद रिक्त आहे. एका मर्यादेपर्यंत तुम्ही उपसभापती असूनही सभापतीपदाचा चार्ज ठेवू शकता, असं जयंत पाटील म्हणाले. विधानमंडळाच्या सचिवांचं काम राज्यपालांना सभापतीपद रिक्त असल्याचं कळवणं महत्त्वाचं असल्याचं म्हटलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram