CM Eknath Shinde on Varsha Bungalow : मुख्यमंत्र्यांची शासकीय निवासस्थानी सहकुटुंब गणेश पूजा
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज गणेशाची पूजा मोठ्या उत्साहात पार पडली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर हा पहिलाच गणेशोत्सव आहे. आज सकाळीच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे यांनी सकाळीच सपत्नीक गणेशाची विधिवत पूजा केली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांचे कुटुंबीयदेखिल उपस्थित होते.
Continues below advertisement