Eknath Shinde : 'MIM ला जवळ घेतलं, उद्या पाकिस्तानलाही घेतील'; शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) जोरदार टीका केली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) मोर्चाला MIM चा पाठिंबा आणि MVA नेत्यांची निवडणूक आयोगाच्या (Election Commission) भेटीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. 'निवडणुका जिंकण्यासाठी एमआयएम काय, ते उद्या पाकिस्तान ला सोबत घेतील, त्यांचा काही भरोसा राहिलेला नाही', असे खळबळजनक विधान मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. त्यांनी पुढे म्हटले की मागच्या निवडणुकीत पाकिस्तानचे झेंडे नाचवले होते आणि दहशतवाद्यांच्या कबरी सजवण्याचे कामही केले होते. जे घटनात्मक पदावर, सुप्रीम कोर्टावर आणि निवडणूक आयोगावर टीका करतात, तेच आता आयोगाकडे जात आहेत, ही चांगली सुधारणा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) ब्रँड हाच आमचा एकमेव ब्रँड असून केलेल्या कामाच्या जोरावर महायुतीच जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola