CM Eknath Shinde Shivneri : शिवजन्मोत्सव सोहळ्याचा उत्साह, शिवनेरीवर पोलिसांडून सलामी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCM Eknath Shinde Shivneri : शिवजन्मोत्सव सोहळ्याचा उत्साह, शिवनेरीवर पोलिसांडून सलामी
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : आज 19 फेब्रुवारी रोजी तारखेनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यासह देशात शिवजयंती (Shiv Jayanti) मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यासह देशभरात शिवप्रेमींमध्ये उत्साह दिसून येत आहे. ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवजन्मोत्सव सोहळ्याचा उत्साह साजरा करण्यात आला, त्यावेळी पोलिसांडून सलामी देण्यात आली.