CM Eknath Shinde Shiv Sena Meeting : उद्या सत्तासंघर्षाचा निकाल, मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली बैठक

Continues below advertisement

CM Eknath Shinde Shiv Sena Meeting : उद्या सत्तासंघर्षाचा निकाल, मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली बैठक

Maharashtra Political Crisis Chronology:  महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आता अवघ्या काही तासांवर आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा (Maharashtra Politics)  बदलवणारा हा निकाल असणार आहे. या ऐतिहासिक याचिकेत आतापर्यंत काय झालं, कसा होता गेल्या नऊ-दहा महिन्यातला घटनाक्रम, हे जाणून घेऊयात...

मागील वर्षी  जून महिन्यात झालेली विधानपरिषदेची ही निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक ठरली. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा या निवडणुकीत पराभव झाला. संख्याबळ कमी असतानाही भाजपनं हे कसं साधलं याची चर्चा सुरु असतानाच अचानक वेगळ्या नाट्याला सुरुवात झाली. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह काही आमदार हे सुरतच्या दिशेनं निघाल्याची बातमी आली आणि तिथूनच सुरु झाला महाराष्ट्राच्या राजकारणातला एक मोठा सत्तासंघर्ष. हा सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टातही कित्येक महिने गाजत राहिला.

शिवसेनेतल्या अंतर्गत कलहानंतर बैठकांचं सत्र सुरु झालं. दोन्ही गटांनी आपापले गटनेते, व्हिप जाहीर केले. बैठकीला आला नाहीत तर अपात्रतेची कारवाई होईल असे इशारेही दिले गेले. एकीकडे ठाकरे गटाकडून ही हालचाल तर दुसरीकडे शिंदे गटानं तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात अविश्वासाची नोटीस आणली. तिथूनच या कायदेशीर पेचाला सुरुवात झाली. 25 जून 2022 रोजी केस देशाच्या सर्वोच्च न्यायालयात पोहचली. पहिली सुनावणी सुट्टीकालीन घटनापीठासमोर सुनावणी झाली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram