Shasan Aplya Dari Jejuri : शासन आपल्या दारी कार्यक्रम पुढे ढकलला, मंत्रिमंडळ विस्तार उद्या?
Shasan Aplya Dari Jejuri : शासन आपल्या दारी कार्यक्रम पुढे ढकलला, मंत्रिमंडळ विस्तार उद्या?
उद्या होणारा जेजुरीतील शासन आपल्या दारी कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलाय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा उद्याचा जेजुरी दौरा पुढे ढकलण्यात आला असून, खंडोबा देवस्थानच्या विविध कामांचा भूमिपूजन समारंभ आणि शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार होता. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारामुळे कार्यक्रम पुढे ढकलल्याची चर्चा सुरू झालीय. दरम्यान, कार्यक्रमाच्या ठिकाणी तयारी सुरू असताना झालेल्या खर्चाला जबाबदार कोण?, असा सवाल आता विचारला जातोय.