CM Eknath Shinde : आम्हाला लाडक्या बहिणींना आणि शेतकऱ्यांना भरपूर काही द्यायचं आहे

Continues below advertisement

CM Eknath Shinde : आम्हाला लाडक्या बहिणींना आणि शेतकऱ्यांना भरपूर काही द्यायचं आहे

राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी यंदा पहिल्यांदाच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी टफ फाईट होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यामुळे राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात येत असून महायुतीने (Mahayuti) उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. महायुतीने आत्तापर्यंत 182 उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, महाविकास आघाडीकडूनअद्याप एकाही उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात न आल्याने सर्वांना महाविकास आघाडीच्या यादीची प्रतिक्षा आहे. त्यातच, महायुती व महाविकास आघाडीशिवाय इतरही पक्षांनी व आघाड्यांनी उमेदवार मैदानात उतरवले आहेत. त्यामध्ये, मनसेनं 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. त्यापूर्वी, मनसेकडून 7 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे, आता महाविकास आघाडीतील (MVA) पक्षांच्या उमेदवारांची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. राज्यातील 288 विधानसभा (Vidhansabha) मतदारसंघांसाठी महायुतीकडून भाजपने 99, शिवसेनेनं 45 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 38 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram