CM Shinde On Ayodhya : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 22 जानेवारीला अयोध्येला जाणार नाही

Continues below advertisement

CM Shinde On Ayodhya : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 22 जानेवारीला अयोध्येला जाणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्येच्या राममंदिरातल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जाणार नाहीत. दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी आपण २२ जानेवारीला अयोध्येला जाणार नसल्याची माहिती ट्विट करून दिली आहे. (( देशवासीयांसाठी अभिमानास्पद अशा अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी, तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असं तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रिमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्तांना सर्वांना घेऊन प्रभू श्रीराम यांचं दर्शन आम्ही घेणार आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram