CM Eknath Shinde PC :सत्तेसाठी,मुख्यमंत्रीपदासाठी कोणी शेपूट घातली ते राज्यानं पाहिलंय,ठाकरेंना टोला

Continues below advertisement

CM Eknath Shinde PC :सत्तेसाठी,मुख्यमंत्रीपदासाठी कोणी शेपूट घातली ते राज्यानं पाहिलंय,ठाकरेंना टोला 

निवडणूका असू द्या नसू द्या शिवसेनेचं काम अखंड सुरू राहते… बाळासाहेबांची हीच शिकवण पूर असो दुष्काळ असो कोविड असो शिवसैनिक कायम मदतीला पुढे असतो… तो कधी घरात बसून काम करत नाही. आपल्या कुटुंबावर संकट आलं की इकडे तिकडे पळणारे कधी कार्यकर्त्यांसाठी धावलेले दिसले नाहीत… इंडियाच्या सभेत फक्त ५ मिनिटं बोलायला दिलं मोदी व्देषाने पछाडलेले लोक तिथं एकत्र जमले होते. मोदींनी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केलं … ३७० कलम रद्द केलं…बाळासाहेबांचे स्वप्न साकार करणाऱ्यांना औरंगजेब म्हणतात… पण त्यांनी याकुब मेननच्या कबरीचं उदात्तीकरण करणारे कोण ? औरंगजेबाने वडिलांना सोडलं नाही… भावाला सोडलं नाही… अशी वृत्ती असणारा औरंगजेब कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे. शेतकऱ्यांना दोन वर्षात ४५ हजार कोटी रुपये देणारं हे पहिलं सरकार आहे… मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन वर्षात २०० कोटी रुपयांची मदत देणारं हे पहिलं सरकार आहे. दोन वर्षांत पाच लाख कोटींची गुंतवणूक आणणारं हे पहिलं सरकार आहे. दोन वर्षांत ५०० लोकहिताचे निर्णय घेणारं पहिलं सरकार आहे. शासन आपल्या दारी या योजनेतून पाच कोटी लोकांना लाभ देणारं पहिलं सरकार आहे बचत गटांच्या ६० लाख महिलांना २५ कोटींचे २५० कोटी देणारं पहिलं सरकार आहे. ७५ वर्षांवरील नागरीकांनी ३ कोटी तिकिटं काढून प्रवास केलाय. हिंदू म्हणायला जीभ कचरायला लागली… * हिंदूहृदयसम्राट म्हणायला जीभ कचरू लागली आहे. योगेश कदमांना पाडायचं कारस्थान त्यांनी केलं.  शिवतिर्थावर बाळासाहेबांचं नाव घेतलं नाही.. मोदींना औरंगजेबाची उपमा देतात हा देशांचा अपमान आहे…

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram