CM Eknath Shinde PC On Union Budget 2024 : नऊ घटकांना न्याय देणारा नवरत्न अर्थसंकल्प : एकनाथ शिंदे
CM Eknath Shinde PC On Union Budget 2024 : नऊ घटकांना न्याय देणारा नवरत्न अर्थसंकल्प : एकनाथ शिंदे आज देशाच्या अर्थमंत्री निर्माला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी मोदी सरकारचा 7 वा अर्थसंकल्प मांडला. यामध्ये शेतकरी, विद्यार्थी, युवकांसाठी रोजगार तसेच मध्यमवर्गीयांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. आजचा अर्थसंकल्प (Union Budget 2024) मांडत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सामान्य आणि मध्यमवर्गीयांचे घराचे स्वप्न पुर्ण करण्यासंबधी मोठी घोषणा केली आहे.आजच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री (Union Budget 2024) सीतारामन यांनी, पीएम आवास योजनेंतर्गत 3 कोटी अतिरिक्त घरे बांधली जातील अशी घोषणा केली आहे. शहरांमधील गृहनिर्माण योजनेसाठी अर्थसंकल्पात 10 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अंतर्गत पीएम आवास योजना 2.0 साठी 10 लाख कोटी रुपये दिले जातील. केंद्र सरकारकडून पुढील 5 वर्षांसाठी 2.2 लाख कोटी रुपयांचा वाटा टप्प्याटप्प्याने दिला जाईल. पीएम आवास योजना 2.0 अंतर्गत तीन कोटी नवीन घरे बांधली जाणार आहे, अशी घोषणा केली आहे. यामुळे आता मध्यम वर्गांचे घर घेण्याचं स्वप्न पुर्ण होणार आहे. पीएम आवास योजनेंतर्गत आणखी 3 कोटी घरे बांधली जाणार आज (मंगळवारी) अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर करताना सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेबाबतही मोठी घोषणा केली आहे. पीएम आवास योजनेंतर्गत 3 कोटी अतिरिक्त घरे बांधली जातील, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सांगितले. ही योजना ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांसाठी आहे.