Pune : अग्रवालांचे महाबळेश्वरमध्ये सरकारी जमिनीवर फाईव्ह स्टार हॉटेल? शिंदे म्हणाले, बुलडोझर फिरवा
Continues below advertisement
सातारा : पुणे अपघातामुळे चर्चेत आलेल्या अग्रवाल कुटुंबाचे अनेक कारनामे बाहेर आले आहेत. अग्रवाल कुटुंबाने महाबळेश्वरमध्येही अनधिकृत बांधकाम केल्याचं समोर आलं असून त्यांनी सरकारी जमिनीवर आलिशान पंचतारांकित हॉटेल उभारल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यावर आता मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अग्रवाल कुटुंबाचे महाबळेश्वरमध्ये बेकायदेशीर हॉटेल असेल तर त्यावर बुलडोझर फिरवा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
अग्रवाल कुटुंबाने जर सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी पंचतारांकित हॉटेल बांधलं असेल तर त्यावर बुलडोझर फिरवा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. त्यामुळे प्रशासन आता पुढे काय पाऊल उचलणार हे पाहावं लागेल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे या गावी तीन दिवस मुक्कामी असून माध्यमांशी बोलताना त्यांनी हे आदेश दिले आहेत.
Continues below advertisement