OBC vs Maratha: ‘सरकार जरांगे पाटलांपुढे झुकले’; वडेट्टीवारांची जोरदार टीका
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधी पक्षातील युती-आघाडीवर, विशेषतः ठाकरे बंधूंच्या संभाव्य मनोमिलनावर सूचक वक्तव्य केले आहे, तर दुसरीकडे नागपुरातील मेळाव्यात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'हे सरकार मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यासमोर झुकले,' अशी थेट टीका वडेट्टीवार यांनी केली. या टीकेला भाजपचे आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी प्रत्युत्तर देताना, जाती-पातीत भांडणे लावण्याचे राजकारण करू नये, असा सल्ला दिला. 'विरोधी पक्षात कोण कोणाशी युती करतंय, याची चिंता करू नका, त्यांची सगळी गणितं आणि समीकरणं आपल्याकडे आहेत,' असे म्हणत शिंदे यांनी महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यामध्ये दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांच्या नावावरून झालेल्या वादानंतर सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement