CM Eknath Shinde on MPSC : न्यायालयाच्या निर्णयाचा आदर, उमेदवारांची बाजू कोर्टात मांडू

एमपीएससीतून निवड झालेल्या १११ जणांच्या नियुक्तीला आज मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. त्यामुळं संतप्त झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी या १११ उमेदवारांना नियुक्तीपत्रं मिळावीत यासाठी आंदोलन केलं. त्यात मराठा क्रांती मोर्चाच्या आबासाहेब पाटील यांचा समावेश होता. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर परिसरातून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते १११ उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येणार होतं. पण उच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानं सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या प्रवर्गातून आता नियुक्तीपत्र देता येणार नाही.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola