CM Eknath Shinde Kolhapur Sangli Daura : मुख्यमंत्री सांगली, कोल्हा'पूर' दौऱ्यावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर आहेत.. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर आणि सांगलीत अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा ठिकाणी भेट देऊन तिथल्या पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत. दरम्यान सांगलीतल्या खानापूरचे आमदार अनिल बाबर यांच्या पत्नीचं काही दिवसापूर्वी निधन झालं. मुख्यमंत्री अनिल बाबर यांचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत.. गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारनं पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केलीय. त्या घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पहिला पूरपाहणी दौरा आहे..