CM Eknath Shinde Interview : 'माझा'वर मुख्यमंत्री EXCLUSIVE; ठाकरेंच्या आरोपांना सणसणीत उत्तरं
CM Eknath Shinde Interview : 'माझा'वर मुख्यमंत्री EXCLUSIVE; ठाकरेंच्या आरोपांना सणसणीत उत्तरं पुरोगामी महाराष्ट्र सगळ्यांनी पाहिलाय पण आजकाल खाल्यचा शब्दातले आरोप प्रत्यारोप होत आहे. कमरेखालचे वार या सगळया गोष्टी लोकांना नाही आवडत. लोकांना विकास हवा. आज जे काही आरोप होतात, खरं तरं सत्ता गेल्यानंतर काही लोकं सैरभैर झालेत. त्यामुळे त्यांचं संतुलन बिघडलंय. पोरटोरांच्यावर मी बोलतं नाही. त्यांचं वय किती, त्याच्या कामाचा अनुभव, पक्षासाठी किती योगदान आहे, आज त्यांच्या वयापेक्षा जास्त पक्षाचं काम केलेले रक्ताच पाणी केलेले लोक आहेत. लोकांकडून पाया पडून घेणं, लोकांना आवडतं नाही. बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे. परंतु हे सरंजामदारपणे वागणारे लोक आपल्या सहकाऱ्यांना घरगडी समजतात. यामुळेच हा इतिहास घडला आहे, एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यंत्रणांचा दुरउपयोग केला जातो,असा टोला विरोधकांकडून वारंवार लगावला जातोय. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं की, सत्तेचा दुरउपयोग, यंत्रणांचा दुरउपयोग हा त्यावेळेस करत होते. हनुमान चालिसा वाचणाऱ्या जोडप्याला तुरुंगात टाकलं, अभिनेत्री कंगना रणौत हिचं घर तोडलं, अशी अनेक प्रकरणं आहे. सत्तेचा दुरउपयोग, यंत्रणा वापरायची आणि लोकांना नाहक त्रास द्यायचा हे काम कोणी केलं? असा सवाल यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, सत्ता वापरुन महाविकास आघाडी अधिक मजबूत करणं हे काम त्यांनी केलं.