CM Eknath Shinde on Ratan Tata Death : रतन टाटांच्या जाण्याने दुर्मिळ रत्न हरपले - शिंदे

Continues below advertisement

CM Eknath Shinde on Ratan Tata Death : रतन टाटांच्या जाण्याने दुर्मिळ रत्न हरपले - शिंदे 

 देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचे आज (दि.9) निधन झाले. मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु असताना इंटेसिव्ह केअर युनिटमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती गंभीर होत चालल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. 

ज्येष्ठ पत्रकार गिरिश कुबेर यांनी एबीपी माझासोबत बोलताना म्हटलं की, देशासाठी आदर्श व्यक्तिमत्वाचा, शालिन उद्योगपती आपल्यातून गेला आहे. रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशासह उद्योगविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. भारतीय उद्योगसमूहाचं एक प्रेमळ आणि सोज्वळ असं स्वरुप रतन टाटा यांचं होतं.  टाटा उद्योगसमुहाचे चेअरमन एन चंद्रशेखर यांनी रतन टाटा यांच्या निधानाचे अधिकृत वृत्त दिले आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram