CM Eknath Shinde meets Amit Shah : सेनेला केंद्रा दोन मंत्रिपदं मिळणार? दिल्लीतील बैठकीनंतर चर्चा
CM Eknath Shinde meets Amit Shah : सेनेला केंद्रा दोन मंत्रिपदं मिळणार? दिल्लीतील बैठकीनंतर चर्चा
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल रात्री उशिरा नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत नेमकं काय ठरलं याचा तपशील एबीपी माझाच्या हाती लागला आहे.. केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या दोघांना स्थान मिळणार आहे. शिंदेच्या वाट्याला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद येणार, अशी सूत्रांची माहिती आहे. कुणाला मंत्री करायच हा निर्णय एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवल्याची माहिती मिळतेय. मात्र यामुळे राज्यातील दोन केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांची मंत्रिपदं धोक्यात येण्याची शक्यता आहे. कालच्या दिल्ली बैठकीत केंद्रीय मंत्री मंडळ विस्तारावरही चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. केंद्रीय मंत्री मंडळ विस्तारानंतर राज्य मंत्री मंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.