CM Eknath Shinde Celebration at Dare : मूळगावी पोहोताच ग्रामस्थांकडून मुख्यमंत्र्यांचं जल्लोषात स्वागत

Continues below advertisement

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे काल प्रथमच आपल्या मूळगावी म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या दरे या गावी आले आहेत... गावच्या घरी ते २ दिवस मुक्कामी असतील. काल मुख्यमंत्र्यांचं आगमन झालं आणि शेकडो ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात  त्यांचं स्वागत करण्यात आले... शासकीय ताफ्यासह मुख्यमंत्री साताऱ्यातल्या तापोळा इथं आले आणि त्यानंतर तराफ्यावरून ते दरे या गावाकडे रवाना झाले.. काल खरंतर महाबळेश्वर परिसरात ३१० मिमि पावसाची नोंद झाली. मात्र एवढ्या पावसातही मुख्यमंत्री तराफ्यावरून त्यांच्या गावी पोहोचले... गावात पोहोचल्यानंतर त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला... त्यानंतर त्यांनी गावच्या मंदिरात जाऊन गावदेवाचं दर्शनही घेतलं. एकनाथ शिंदे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब दरे गावात दोन दिवस मुक्कामी असणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram