ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 08 AM : 30 July 2024 : Maharashtra News

Continues below advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर बैठक, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  चर्चा  

मुख्यमंत्री शिंदे आणि उद्योजक गौतम अदानी यांची रात्री वर्षा बंगल्यावर भेट, बैठकीत धारावी पुर्नविकासावर चर्चा झाल्याची माहिती

मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आज मातोश्रीवर जबाब दो आंदोलन, सोमवारी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची भेट न झाल्याने ठोक मोर्चा आक्रमक

विविध योजनांच्या जाहिरातींवर सरकार २७० कोटी ५ लाख रुपये खर्च करणार, महायुती सरकारचा शासन निर्णय जारी, खर्च लाडक्या खुर्चीसाठी, विजय वडेट्टीवारांची टीका

राजू शेट्टींनी अंतरवाली सराटीत घेतली मनोज जरांगेंची भेट, दोघांमध्ये दीड तास संवाद, सामाजिक विषयांवर चर्चा झाल्याची शेट्टींची माहिती 

उरण हत्याकांड प्रकरणी मोठी माहिती समोर, २५ जुलैच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये आरोपी दाऊद शेख करत होता तरुणीचा पाठलाग 

उरण हत्याकांड प्रकरणात कर्नाटकातून मोहसीन ताब्यात, कॉल रेकॉर्डवरुन पीडितेच्या संपर्कात असल्याचे नवी मुंबई पोलिसांकडे पुरावे, उद्या महाराष्ट्रात आणणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram