Devendra Fadanvis: 'बंगल्यांवर ३५ लाखांपेक्षा जास्त खर्च नको', Fadnavis यांचा PWD अधिकाऱ्यांना इशारा
Continues below advertisement
नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांच्या बंगल्यांवरील खर्चाच्या उधळपट्टीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली आहे. 'नागपूरच्या रविभवन इथल्या कोणत्याही मंत्र्यांच्या बंगल्यावर पस्तीस लाखाच्या वर निधी खर्च करायचा नाही', असे थेट निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. एकीकडे राज्यासमोर आर्थिक आव्हान असताना, विधानसभा अध्यक्षांच्या बंगल्याच्या डागडुजीसाठी १.२५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी तातडीने बैठक घेऊन सर्वच बंगल्यांच्या दुरुस्तीची खर्चाची मर्यादा ३५ लाख रुपयांवर आणली. या अनावश्यक खर्चाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, मुख्यमंत्र्यांनी जुने फर्निचर आणि साहित्य वापरूनच काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement