Shaktipeeth Expressway Row: ‘मार्गात बदल होऊ शकतो’, CM Devendra Fadnavis यांची नागपुरात मोठी घोषणा!

Continues below advertisement
शक्तिपीठ महामार्गाच्या (Shaktipeeth Expressway) मार्गामध्ये बदल करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत, तर दुसरीकडे शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetti) आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी यावर टीका केली आहे. ‘शक्तिपीठ महामार्गाच्या मार्गामध्ये बदल होऊ शकतो,’ अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. नागपुरातील रामगिरी या शासकीय निवासस्थानी दिवाळीनिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. विशेषतः सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमधील विरोधानंतर मार्गात बदल अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. या महामार्गाला विरोधी पक्षांसह कोल्हापूर परिसरातील नागरिकांचा तीव्र विरोध होता, ज्यामुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागल्याचे मानले जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेवर शेतकरी नेते राजू शेट्टी आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी टीका केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola