Vasantdada Sugar Institute Inquiry : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Continues below advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (Vasantdada Sugar Institute) चौकशीचे आदेश दिले आहेत, ज्याचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आहेत. ‘साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत सरकारी अनुदानाच्या वापराची दोन महिन्यांत चौकशी करा,’ असे आदेश मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने दिले आहेत. 2009-10 पासून संस्थेला मिळालेल्या अनुदानाचा वापर मूळ उद्देशासाठी झाला की नाही, हे या चौकशीत तपासले जाणार आहे. काँग्रेस सरकारच्या काळात, राज्यातील ऊस गाळप करणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रति टन एक रुपया या संस्थेला संशोधनासाठी देण्याची सवलत होती. शरद पवार हे गेल्या तीस वर्षांपासून या संस्थेचे अध्यक्ष असून, अजित पवार (Ajit Pawar), जयंत पाटील (Jayant Patil) आणि हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) हे नियामक मंडळावर आहेत. वसंतदादा पाटील यांनी डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट नावाने ही संस्था स्थापन केली होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola