CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Devendra Fadnavis on Mumbai Rain: मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रशासनाकडून देण्यात येत असलेल्या अलर्टचे तंतोतंत पालन करा. कारण, पुढील दोन दिवसांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस (Heavy Rain) आणि वादळं येण्याची शक्यता असल्याचे देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Maharashtra Rain news)
ठाणे, रायगड, पालघर असेल पुण्याचा काही भाग, नाशिक याठिकाणी मुसळधार पाऊस आहे. कालपासून आपण वेगवेगळे अलर्ट दिले आहेत. या भागात सातत्याने 6 जूनपर्यंत मुसळधार पाऊस असेल, वादळंही येतील. तसेच या भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. आपण दर तीन तासांनी आपण या भागातील नागिरकांना एसएमएस पाठवत आहोत. शाळांना सुट्टी दिली आहे. लोकांन विनंती केली आहे की, प्रवास टाळता आला तर टाळला पाहिजे, गरज असेल तरच घराबाहेर पडा. आता ज्याप्रकारे पाऊस आणि वादळ आहे काही अपघात होऊ नयेत म्हणून प्रशासनाकडून अलर्ट पाठवले जात आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. माझी लोकांना विनंती आहे की, आपण नीट अलर्ट देतोय , लोकांनी ते अलर्ट फॉलो करावेत, शक्यतो त्याप्रमाणे बाहेर पडावे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पहाटेपासून ठराविक अंतराने पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. मुंबई आणि पालघर जिल्ह्याला पुढील काही तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट असून या भागात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर वसई आणि विरार परिसरातही सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. नालासोपारा परिसरातही कंबरेइतके पाणी साचले आहे. समुद्राला दुपारी दोनच्या सुमारास भरती आली आहे. त्यामुळे पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईकरांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.