ABP News

CM Devendra Fadnavis Meet Raj Thackeray : मुख्यमंत्री फडणवीस 'शिवतीर्थ'वर राज ठाकरे यांच्या भेटीला

Continues below advertisement

CM Devendra Fadnavis Meet Raj Thackeray : मुख्यमंत्री फडणवीस 'शिवतीर्थ'वर राज ठाकरे यांच्या भेटीला

Devendra Fadnavis Meet Raj Thackeray : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडे दाखल झाले आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही पहिलीच भेट आहे. मुख्यमंत्री सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट ॲंड गाईड हाॅलमधील शिवाजी पार्कमध्ये परीक्षा पे चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रमाला उपस्थितीत राहणार आहेत. त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला आले आहेत. दरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या 20 मिनिटांपासून चर्चा सुरू आहे. परिणामी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने या दोन दिग्गज नेत्यांच्या अचानक भेटीमुळे अनेक चर्चेला उधाण आले आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram