Shaktipeeth Expressway: 'शक्तिपीठ महामार्गात बदल शक्य', CM Devendra Fadnavis यांचे Nagpur मध्ये मोठे विधान

Continues below advertisement
नागपूरमध्ये दिवाळी मिलन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शक्तिपीठ महामार्गावर (Shaktipeeth Mahamarg) महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. 'शक्तिपीठ महामार्गामध्ये काही बदलांचा विचार होऊ शकतो', असे संकेत मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक संवादात दिले. पश्चिम महाराष्ट्रात, विशेषतः सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये या महामार्गाला शेतकऱ्यांचा आणि विरोधी पक्षांचा मोठा विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले असून, रामगिरी या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. या महामार्गामुळे मराठवाड्यातील जिल्ह्यांचा विकास होईल, पण कोणाच्याही जमिनी जबरदस्तीने घेतल्या जाणार नाहीत, असेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे आता या महामार्गाच्या पश्चिम महाराष्ट्रातील टप्प्यात बदल होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola