Maharashtra Politics: ‘ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर लढेल’, मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे विधान
Continues below advertisement
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या भूमिकेवर महत्त्वाचे भाष्य केले आहे. 'ज्या ज्या ठिकाणी मित्र पक्ष एकमेकांचे स्पर्धक आहेत तिथे वेगळं लढू,' असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी ही माहिती दिली. पुणे, ठाणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार आहे, तर दुसरीकडे शिवसेनेचा (ठाकरे गट) बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुंबईत मात्र भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुती म्हणून एकत्र लढतील, असेही त्यांनी सांगितले. या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून महायुतीतील जागावाटपाचे चित्र अधिक गुंतागुंतीचे होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement