Jalindar Supekar Amitabh Gupta | ४४८ कोटींच्या कारागृह खरेदी प्रकरणी सुपेकर-गुप्तांना क्लिन चीट!
जालिंदर सुपेकर आणि तत्कालीन अप्पर पोलीस महासंचालक कारागृह अमिताभ गुप्ता यांना गृह विभागाकडून क्लिन चीट मिळाली आहे. ४४८ कोटींच्या कारागृहातील वस्तू खरेदी प्रकरणात ही क्लिन चीट देण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या प्रकरणी नियमबाह्य कंत्राटं देत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. वडगावशेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिले. या उत्तरातून सुपेकर आणि गुप्ता यांना क्लिन चीट मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, "या वस्तूंची खरेदी निविदा मागवून आणि नियमानुसार झाली आहे." या माहितीमुळे कारागृह वस्तू खरेदी प्रकरणातील आरोपांवर पडदा पडला आहे.