College Admissions Start | अकरावीची पहिली गुणवत्ता यादी ३० जूनला जाहीर होणार
अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा बदल झाला आहे. पहिली गुणवत्ता यादी आता ३० जूनला जाहीर होणार आहे. शिक्षण संचलनालयाने याबाबत परिपत्रक जारी केले आहे. अल्पसंख्यांक समुदायाच्या शाळा-महाविद्यालयातील प्रवेश क्षमतेमध्ये बदल अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना १ ते ७ जुलै दरम्यान प्रवेश घेण्यासाठी वेळ दिला जाईल.