Akola Clash: गोमांस विक्रीच्या संशयावरून 2 गट भिडले, Police आणि BJP कार्यकर्त्यांवर दगडफेक

Continues below advertisement
अकोला (Akola) शहरातील बैतपुरा (Baitpura) भागात गोमांस (Beef) विक्रीच्या संशयावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी (Police) मारहाण झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे. भाजप (BJP) कार्यकर्ते आणि पोलिसांना एका दुकानातून गोमांस विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी याठिकाणी धाड टाकली. या धाडीनंतर दोन गट आमनेसामने आले आणि त्यांच्यात बाचाबाची झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांवर दगडफेक आणि मारहाण करण्यात आली. मात्र, अकोला पोलिसांनी मारहाण झाल्याच्या वृत्ताचे खंडन केले असून, केवळ दोन गटात वाद झाल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून, पोलीस परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola