City 60 SuperFast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवाग आढावा : 19 May 2024
City 60 SuperFast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवाग आढावा : 19 May 2024
महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्यातल्या 13 जागांसाठी उद्या मतदान.. महामुंबईसह ठाणे, कल्याण, नाशिक, पालघरमधील लढतीकडे लक्ष.
मुंबईतील ६ जागांसाठी उद्या मतदान, दक्षिण मुंबईत होणाऱ्या मतदानासाठी मुंबईत २ हजार ५२० मतदान केंद्र, या पार्श्वभूमिवर निवडणूक अधिकाऱ्यांना मतपेट्या आणि साहित्यांचं वाटप.
मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई... मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांची माहिती.
मुंबईतील सहा जागांसाठी उद्या मतदान, पुणे-मुंबई द्रुतगतीवर अवजड वाहतुकीला बंदी
उद्या नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट बंद राहणार..माथाडी कामगार, व्यापारी वर्गाला मतदान करता यावं यासाठी एपीएमसी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय.
निवडणूक आयोगाकडून महिला मतदारांसाठी खास विशेष सखी बुथ.. बुथवर फुलांची सजावट.. तर विशेष बुथवर सर्व महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती.
मतदानासाठी मुंबईत एसटीच्या १ हजार १६१, तर बेस्टच्या ६२९ बस धावणार, कर्मचाऱ्यांची ने-आण, दिव्यांग मतदारांसाठी बेस्ट बस उपलब्ध.
मुंब्र्यातील शिवसेनेच्या वादग्रस्त शाखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली भेट.. यंदा अल्पसंख्याक मतं महायुतीला मिळतील, शिंदेंनी व्यक्त केला विश्वास.
महाराष्ट्राच्या निवडणुकांचा रणसंग्राम संपल्यानंतर मुख्य़मंत्री शिंदे रिलॅक्स... आनंद दिघे यांच्या समाधी स्थळाला दिली भेट.