City 60 SuperFast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवाग आढावा : 10 PM 26 May 2024

Continues below advertisement

नाझरे धरण आटलं, ५६ गावांवर पाणीटंचाईचं संकट

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, खामगाव तालुक्यात विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, अनेक घरांवरील छत उडाले.  

अकोल्याच्या अकोटमध्ये वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस, पणज गावात धान्याच्या गोदामावरील पत्रे उडाले, तर अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडाल्याने मोठं नुकसान. 

पंढरपूर तालुक्यात कासेगाव सह अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, उन्हाळी पिकांचं नुकसान होण्याची भीती. 

यवतमाळच्या आर्णी आणि महागाव तालुक्यातील तिवरंग,चिखली, मलकापूर या गावांना वादळाचा तडाखा, जवळपास 25 घरांची पडझड, अनेक ठिकाणी झाडं पडल्याने रस्ते बंद. 

वादळी वाऱ्यामुळे बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील एका मंदिराची स्वागत कमान कोसळली, कोणतीही जीवीतहानी नाही, जवळच उभ्या असलेल्या कारचा मात्र चुराडा. 

जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, केळी पिकासह अनेक घरांचं मोठ्या प्रमाणत नुकसान, मंत्री गिरीश महाजनांकडून घरांची पाहणी. 

धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या डेडरगाव तलावातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट,  पंधरा ते वीस दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक. 

३१ मे दरम्यान केरळात तर १० जूनदरम्यान मुंबईसह कोकणात मान्सूनचं आगमन होणार, १५ जूनदरम्यान ((सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून)) उर्वरीत महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल,हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांची माहिती. 

पुढील आठवड्यात सोमवारपासून मुंबईत हलक्या पावसाची शक्यता,  सोमवार ते बुधवार मुंबईत हलक्या सरींचा अंदाज. 

छत्रपती संभाजीनगरमधील हरसुल तलावात 15 दिवस पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक, मृतसाठ्यातून रोज 5 एम एल डी पाण्याचा उपसा.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram