City 60 News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 23 Jan 2025

Continues below advertisement

City 60 News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 23 Jan 2025  
सैफ अली खानवर हल्ला करणारा शरीफुल इस्लाम बांगलादेशी असल्याचे पुरावे समोर. मुंबई पोलिसांना शरीफुलचे बांगलादेशी ड्रायव्हिंग लायसन आणि अन्य कागदपत्रे मिळाली. 
ज्या पोलिसांकडून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला त्यांच्यावर गुन्हा दाखल. न्यायालयाच्या आदेशानंतर अक्षय शिंदेच्या वकिलांनी मुंब्रा पोलीस स्थानकात केला गुन्हा दाखल. 
तुलसी इमारतीवर कारवाईनंतर नालासोपाऱ्यातील आजची तोडक कारवाई थांबवण्यात आलीय, उद्या पुन्हा तीन इमारतींवर केली जाणार कारवाई.  
मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिम येथील ओशिवरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रायन ग्लोबल स्कूलला बॉम्बने उडवण्याची धमकी. शाळेला मिळाला धमकीचा ईमेल. धमकी देणाऱ्यांचा शोध सुरु. 
माढ्याच्या प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर -ठोकळ यांच्यांवर वाळू माफियांचा हल्ला,  माढा तालुक्यातील टेंभुर्णीजवळील घटना. वाळूवर कारवाई केली म्हणून केला हल्ला. 
टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना डॉक्टर ऑफ सायन्स मानद डॉक्टरेट पदवीनं केलं सन्मानित.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram