City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 24 डिसेंबर 2024 : 8 PM ABP Majha

Continues below advertisement

आज, उद्या आणि ३१ डिसेंबरला रात्रभर हॉटेल, बार सुरू राहणार,  वाईन शॉप मध्यरात्री 1 वाजेपर्यंत तर परमीट रूम, ऑर्केस्ट्रा बार, बीअर बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहणार. 

नाताळनिमित्त उद्या सार्वजनिक सुट्टी, तरीही राणीची बाग उद्या पर्यटकांसाठी खुली राहणार असून गुरुवारी बंद ठेवण्यात येणार.

बेस्ट कामगार सेनेचा 26 डिसेंबरला काळ्या फिती बांधून काम करण्याचा निर्णय, वाढते बस अपघात तसेच कंत्राटी बससेवांवर तोडगा काढण्यास पालिकेने मदत करण्यास नकार दिल्याने आंदोलन.

राज्यात प्रशासकीय बदलास सुरुवात. मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट. बेस्टच्या  महाव्यवस्थापकपदी हर्षदीप कांबळे यांची नियुक्ती. तर अनिल डिग्गीकर यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली.

बसचा अपघात तांत्रिक कारणांमुळे, ब्रेक फेल झाल्याचा दावा करत चालक संजय मोरेचा जामिनासाठी अर्ज. सरकारी पक्षानं उत्तर देण्यासाठी मागितला वेळ. सुनावणी 2 जानेवारीपर्यंत तहकूब.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मेट्रोच्या कामाला गती. राज्य सरकारकडून मुंबई, ठाणे, मुंबई महानगरातील मेट्रोसह पुण्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी एमएमआरडीएला भरघोस निधी. तिन्ही मेट्रो मार्गांसाठी एमएमआरडीएला २७२ कोटी रुपये वितरीत.

राज्यातील अनेक जिल्ह्यात २६ आणि २७ डिसेंबरला पावसाचा अंदाज, उत्तर, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता,मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाचा अंदाज

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram