
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :12 PM : 28 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :12 PM : 28 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
राष्ट्रीय निवडणूक अधिकारी आणि राज्यातील भाजप संघटना यांच्या समन्वयासाठी बुधवारी पक्षाकडून केंद्रीय निरीक्षकांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांची उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन्ही मोठ्या राज्यांचे केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार?, याची चर्चा रंगली असताना विनोद तावडेंना ही जबाबदारी दिल्याने विविध राजकीय चर्चा रंगल्या आहेत.
विनोद तावडे यांच्या मदतीसाठी संजीव चौरसिया, संजय भाटिया आणि लाल सिंग आर्य यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र व गोव्याचे निरीक्षक म्हणून सरचिटणीस अरुण सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देशभरातील भाजप संघटनेत बूथ अध्यक्षांच्या निवडणुका होत होत्या. आता भाजप मंडल अध्यक्षांची निवडणूक 15 डिसेंबरपर्यंत, तर जिल्हाध्यक्षांची निवडणूक 30 डिसेंबरपर्यंत होणार आहे. यानंतर प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुकीसाठी दिल्लीत एक मोठी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.