City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 11 डिसेंबर 2024 : 07 PM ABP Majha
परभणीमध्ये आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड, महिला आंदोलकांनी कार्यालयातील काचा आणि इतर साहित्य फोडलं, पोलिसांनी केलं होतं शांतता राखण्याचं आवाहन.
परभणीत संतप्त महिला आंदोलकांकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातही तोडफोड, दरवाजे, खिडक्यांच्या काचा आणि इतर साहित्याचीही तोडफोड.
परभणीतील जाळपोळप्रकरणी ४० जण पोलिसांच्या ताब्यात, नियमानुसार कारवाई होणार, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांची माहिती.
परभणीमध्ये आतापर्यंत ७ बसेसची तोडफोड, अनेक वाहनं आणि दुकानांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान.
परभणीत दुपारी झालेल्या दगडफेकीत पोलीस प्रशासनातील काही अधिकारी आणि अनेक कर्मचारी जखमी, सध्या परभणी शहरासह जिल्हाभरात तणावपूर्ण शांतता.
जालना मार्गे परभणी-जिंतूरला जाणाऱ्या जवळपास १५ एसटी बसेस मंठा इथं थांबवल्या, परतूर आणि अंबड आगारातील परभणीकडे जाणाऱ्या ७ बसफेऱ्याही रद्द, खबरदारी म्हणून एसटी महामंडळाचा निर्णय.
परभणीत आंबेडकरी जनता आक्रमक, विसावा कॉर्नर परिसरात बंद दुकानांबाहेरील साहित्य आणि बोर्ड फोडले, काल आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची झाली होती विटंबना.
संविधान पुस्तिकेच्या शिल्पाची विटंबना केल्याच्या निषेधार्थ परभणी बंदला हिंसक वळण, विसावा कॉर्नर परिसरात जाळपोळ, गाड्यांची तोडफोड, तर पोलिसांच्या गाड्यांवरही आंदोलकांकडून दगडफेक.