City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM : 25 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 25 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha
हेही वाचा : 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election Result 2024) चा निकाल जाहीर झाला आहे. यंदाच्या विधानसभेत महायुती (Mahayuti) घवघवीत यश मिळवत सत्तेची चावी आपल्याकडे राखण्यात यशस्वी ठरली. तर, महाविकास आघाडीला (Maha Vikas Aaghadi) दारुण पराभवाचा सामना करावा लागला. पण, यंदाच्या विधानसभेत सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. मतदारांनी महायुतीच्या पदरात मतांचं दान टाकलं खरं, पण त्यासोबतच अनेक विद्यमान आमदारांना पराभवाची चव चाखायला भाग पाडलं. अनेक ठिकाणी तर मतदारांनी प्रस्थापितांचा पुरता धुव्वा उडवला. यंदाच्या निवडणुकीत तब्बल 65 आमदारांना पराभवाचा सामना करावा लागला. एवढंच काय तर, तब्बल 6 आमदारांचं तर डिपॉझिटही जप्त झालं आहे. 

महाराष्ट्राच्या चौदाव्या विधासभेतील तब्बल 185 आमदार पुन्हा पंधराव्या विधानसभेत दिसणार आहेत. 250 आमदारांनी पुन्हा निवडणूक लढवली, त्यापैकी 65 आमदारांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर, तब्बल 6 आमदारांचं डिपॉझिटही जप्त झालं आहे. या पराभूत आमदारांमध्ये सर्वाधिक 19 काँग्रेसचे, तर राष्ट्रवादीचे (अजित गट) 10  आमदार निवडणुकीत पराभूत झाले आहेत. तर, शरद पवारांचे 8 आणि उद्धव गटाचे 7 आमदार पुन्हा जिंकू शकले नाहीत. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या 6, भाजपचे 5, बहुजन विकास आघाडीचे 3, प्रहारचे 2, एमआयएम आणि मनसेच्या एका आणि तीन अपक्ष आमदारांना पराभवाचा सामना करावा लागला. या सर्व आमदारांना मतदारांनी नाकारल्याचं निवडणूक निकालांमध्ये स्पष्ट झालं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram