City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM : 21 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 21 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवारी संपन्न झाली. लोकसभा निवडणुकीला राज्यात मतदारांचा निरुत्साह दिसून आला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का (Maharashtra Vidhan Sabha Voting Turnout) वाढल्याचे दिसून आले. बुधवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 65 टक्क्यांच्या आसपास होती. त्यामुळे अंतिम आकडेवारीत मतदानाच्या टक्क्यात भर पडून तो 68 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लोकसभा निवडणुकीत 61.29 टक्के मतदान झाले होते. ग्रामीण भागांच्या तुलनेत शहरी भागात नेहमीप्रमाणे मतदानाकडे नागरिकांना पाठ फिरवल्याचे दिसून आले. त्यामुळे निवडणूक आयोगाने अनेक उपाययोजना करुनही मुंबई आणि उपनगरातील मतदानाचा टक्का (Mumbai Voting Percentage) किंचित वाढण्यापलीकडे फार काही साध्य झाले नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीप्रमाणे मुंबईत मुस्लीम मतदारांनी (Muslim Voters) भरभरुन केलेले मतदान हे यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले.

मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात अंदाजे 50 ते 55 टक्क्यांच्या आसपास मतदान झाल्याचा अंदाज आहे. मुस्लीमबहुल भागांमध्ये मतदानाची टक्केवारी लक्षणीयरित्या वाढल्याचे दिसून आले. चांदिवली, जोगेश्वरी, फिल्टरपाडा, आग्रीपाडा, पठाणवाडी, नागपाडा, भायखळा या भागांमध्ये मतदान केंद्रांवर मोठी गर्दी झाली होती. लोकसभा निवडणुकीत मुस्लीमबहुल भागांमधील मतदानाने अनेक मतदारसंघांचा निकाल फिरवला होता. अन्य मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवाराला लीड असूनही केवळ एका मुस्लीमबहुल मतदारसंघात मविआच्या उमेदवारांना झालेल्या एकगठ्ठा मतदानामुळे मालेगाव, ईशान्य मुंबई या मतदारसंघातील निकाल बदलला होता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram